बचत खाते एक फायदे अनेक

बचत खाते एक फायदे अनेक

तुमचे पैसे वाढवा आणि तुमचे ध्येय गाठा

एका उत्तम व्यवसायिकाला साथ हवी असते ती विश्वासार्ह व परिपूर्ण बँकिंग सेवांची, जी पूर्ण होते साईबन अर्बन मध्ये! कारण आम्ही आमच्या खातेधारकांना उपलब्ध करून देतो अत्याधुनिक बँकिंग सुविधा आणि जोडीला व्यवसायात आर्थिक स्थैर्य मिळावं म्हणून भक्कम पाठबळ! तुम्ही जर एक व्यवसायिक आहात तर आजच आपले बचत खाते उघडा आणि मिळवा NEFT / RTGS / IMPS, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, स्वाईप मशीन, आधार बँकिंग, इत्यादी सुविधा एकाच छताखाली.

दिवस रात्र एक करून, काबाडकष्टाने एक-एक रुपया जोडून जमवलेली रक्कम एका सुरक्षित आणि विश्वासार्ह हाती हवी, तेव्हाच एका सर्वसामान्य माणसाला शांत झोप लागते. साईबन अर्बन तुमच्या या बचतीचे महत्त्व जाणते, म्हणूनच तुमची बचत आम्ही जबाबदारीने सांभाळतो आणि त्यावर जास्तीत जास्त परतावा देखील देतो. इतकंच नाही तर बचत खात्यासोबत चेकबुक, NEFT, RTGS, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, एसएमएस बँकिंग या सुविधादेखील देतो, जेणेकरून गरजेच्या वेळी तुम्हाला तुमची रक्कम त्वरित मिळावी.

आकर्षक व्याजदर


महिने व्याजदर
1 ते 3 8.00%
3 ते 6 9.00%
7 ते 9 10.00%
9 ते 12 11.00%
12 ( 12 महिन्या जास्त कालवधी ) 12.00%