व्यवस्थापना बद्दल

व्यवस्थापना बद्दल

साईबन अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड

आमच्या कर्मचार्यांच्या कल्पनांना आमंत्रण देणारे, आमच्या भागधारकांचा आत्मविश्वास वाढवणारे आणि आमच्या ग्राहकांच्या अपेक्षापेक्षा जास्त असणारे व्यावसायिक वातावरण आम्ही तयार करतो

ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने २०२१ साली तरुण विचारांच्या तरुणांनी सुरु केलेल्या साईबन अर्बन चा बघता-बघता ५०००+ हुन अधिक सदस्यांचा महापरिवार झाला आहे. येणाऱ्या प्रत्येकाला जिव्हाळ्याने, आपुलकीने जपणं आणि उत्तम सेवा देणे हे आद्य कर्तव्य समजून प्रामाणिक प्रयत्न करत आहो ग्राहकांना मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, लाईट बिल मोबाईल, रिचार्ज,QR कोड, आधार बँकिंग, SMS बँकिंग, मायक्रो ATM, इ. सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे निरंतर प्रगतीचे साधन समजून काळानुरूप कार्यपद्धतीत बदल करत सवस्थेचे नेहमीच ग्राहक सेवेचे नव-नवीन मानदंड प्रस्थापित केले आहेत. भारतात कोठेही पैसे पाठवायची आणि स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध आहे. ग्राहकांची गरज लक्षात घेऊन ठेवी व कर्जाकरिता विविध पर्याय उपलब्ध करून देत संस्था अल्प कालावधीतच ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

साईबन अर्बन

ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने २०२१ साली तरुण विचारांच्या तरुणांनी सुरु केलेल्या साईबन अर्बन चा बघता-बघता ५०००+ हुन अधिक सदस्यांचा महापरिवार झाला आहे.

व्हिजन

उद्योग व्यवसाय तथा नागरिकांना मदत करून सर्वांना बुलंद भारत निर्माणसाठी सक्षम व समृद्ध करणे..

मिशन

जीवनस्तर उंचावण्यासाठी लोकांना समान संधी उपलब्ध करून देणे.

मूल्ये

जीवनस्तर उंचावण्यासाठी लोकांना समान संधी उपलब्ध करून देणे.

सामाजिक जबाबदारीतून एक पाऊल पुढे

साईबन अर्बन आपल्या ‘सामाजिक उत्तरदायित्व’ बद्दल कायम वचनबद्ध आहे आणि ते आमच्या उपक्रमांचा अविभाज्य भाग आहे. साईबन समूहाचे भागधारक, कर्मचारी तसेच विविध सामाजिक घटकांच्या सहभागाद्वारे अनेक अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून साईबन समूहाने सामाजिक विकासात योगदान दिले आहे.

भविष्यात ग्रामीण भागातील अर्थपूर्ण सामाजिक-आर्थिक विकासासाठी समर्थपणे उभे राहून होणाऱ्या विकासाचा फायदा मोठ्या संख्येने साईबन अर्बन मिळवून देण्याच्या उद्देशाने साईबन समूह सदैव प्रयत्नशील असेल.

साईबन अर्बन.हि महाराष्ट्रातील एक अग्रणी साईबन अर्बन सहकारी संस्था आहे. सहकारी तत्वे अनुसरुन, लोकशाही मार्गाने,समाजाच्या सामाजिक व आर्थिक परिवर्तनातून समाजातल्या विविध घटकांच्या बहुआयामी विकासाचा आमचा प्रयत्न आहे

सहकारातून सामाजिक व आर्थिक परिवर्तनाकडे


आमचे उद्दिष्ट

समाजातल्या विविध घटकांना सेवा देत, राष्ट्रीय पातळीवर स्थान निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत, `सहकारी सामायिक संपत्ती`निर्माण करून सभासदांचे आणि कर्मच-यांचे मूल्य वाढवित एक दूरदर्शी, तंत्रसिध्द आणि ग्राहकानुवर्ती सहकारी संस्था म्हणून साईबन अर्बन. अस्तित्व सिध्द करणे, हे आमचे मुख्य उद्दीष्ट आहे

आमची मूल्ये

लोकांनी आपल्याकडून ज्या अपेक्षां केल्या त्यापेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न करून, आम्ही आमच्या ग्राहकांना दररोज एक आनंददायक व तत्पर सेवेचा अनुभव खालील तत्वांच्या आधारे देण्यास साईबन अर्बन कटिबद्ध आहे.

विश्वास आणि
पारदर्शकता

उच्च प्रशिक्षित
कर्मचारी

विश्वसनीय
नेटवर्क

आर्थिक
समावेशन

साईबन अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ही क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा लि ऍक्ट 1960 अंतर्गत नोंदणीकृत साईबन अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आहे, नोंदणी क्र. अेजीडी / अेजीडी / आरएसआर / सीआर / २५२ / २०२३

साईबन अर्बन


क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा नियम, ऍक्ट 1960 च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करते आणि संस्था सदस्यांमध्ये आर्थिक व्यवहार करते.

महिलांसाठी एक लाखांर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देणारी, इतर बँकांपेक्षा बचतीवर जास्त व्याज देणारी आणि तुलनेत स्वस्तात कर्ज देणारी पहिली साईबन अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड कार्यान्वित झाली.

महिलांच्या हातात आर्थिक सत्ता देण्याच्या उद्देशाने स्थापलेली अशी ही साईबन अर्बन हेच या बँकेचे वैशिष्ट्य ठरणार आहे!

‘साथ विश्वासाची वाट विकासाची’ असे ब्रीदवाक्य असलेल्या या साईबन अर्बन चे व्यवहार अन्य कुठल्याही सरकारी किंवा खासगी बँकेसारखेच राहतील. खातेदार महानगर, मोठी शहरे, निमशहरे आणि ग्रामीण भागांत टप्प्याटप्प्याने साईबन अर्बन शाखा विस्तार केला जाणार आहे. महिला बचत गट, स्वयंरोजगार करणाऱ्या महिला, लघुउद्योजक, शैक्षणिक मदतीसाठी विद्यार्थिनी अशा गरीब-गरजू महिलांना प्राधान्याने कर्ज उपलब्ध करून देणार असल्याची माहिती साईबन अर्बन चे अध्यक्ष यांनी दिली.

लाखो महिला सूक्ष्म उद्योजिकांना यशस्वीरित्या आपला व्यवसाय वाढविता यावा आणि आपल्या कुटुंबात व समाजात त्यांना मान मिळावा या दृष्टीने पोषक वातावरण निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.

'महिलांचा आर्थिक विकास हाच साईबन अर्बन ध्यास.' आम्ही केवळ बँकिंग सुविधा पुरवत नसून महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मविश्वासु व स्वावलंबी बनण्यास मदत करून त्यांच्या सबलिकरणासाठी वाहून घेतलेला समूह बनवीत आहोत.